Ad

कोरियन style Rice paper dumplings

 


🌟कोरियन स्टाईल राईस पेपर डम्पलिंग्स / पॉकेट्स | Easy Korean Rice Paper Dumplings Recipe | झटपट हेल्दी स्नॅक
✨ आज आपण एकदम वेगळी आणि चविष्ट रेसिपी पाहणार आहोत – Korean Style Rice Paper Dumplings / Pockets 😋
ही रेसिपी सोपी, हेल्दी आणि झटपट बनवता येणारी आहे.

💚Highlights💚
Vegetarian & Healthy Recipe
Quick Korean Snack in Indian Style
Perfect for Evening Snack & Party Starter
Crispy & Delicious Rice Paper Pockets

🌼Ingredients
rice paper sheets
Diced mushrooms: 1/2 cup cup
Chopped carrots: 1cup
Chopped green cabbage: 1cup
Diced capsicum: 1/2 cup
Chopped onions
4 garlic cloves
1/2 tsp korean hot chilli sauce
1/2 tsp chilli oil
2 tsp soy sauce
1 tsp green chilli sauce
2-3 tsp Schezwan chutney
Oil for frying

🌼Procedure:
Prepare your filling by shredding the cabbage and carrots finely. Finely dice the capsicum and mushrooms into small cubes.
In a large pan sauté garlic and onion for a few minutes in oil. Once cooked add all the vegetables When they’re half cooked and starting to soften, Add soy sauce along with a green chilli sauce, stir and cook with lid for 2 mins then add korean hot chilli sauce, schezwan chutney and mix properly..and set the mixture aside to cool down

Dip a rice paper sheet in water for a few seconds and place on the damp surface. Add a spoon of the filling mixture in the centre of the sheet in a rectangle shape
Starting at the bottom, fold over the rice paper sheet to cover the filling. Then fold the top of the sheet over the filling, then the same with the sides so you will be left with a square/rectangle shape pocket
Dip a second rice paper sheet in the water, place on the damp surface and place the pocket in the middle. Wrap the pocket the same way by folding from the bottom first and so on, to double wrap the filling
Repeat this process until all the filling has finished
Pan fry the dumplings in your preferred oil over a medium-high heat for a few minutes on each side until lightly golden
Serve with a dipping sauce, and enjoy your crispy Rice Paper Dumplings

🔔 आणखी अशा झटपट आणि क्रिएटिव्ह रेसिपीजसाठी channel पाककला (Beauty & Art) subscribe करा!




आगरी मसाला





❤️आगरी मसाला ❤️10 किलो,अतिशय चविष्ट,झणझणीत, लालभडक रंगाचा आगरी मसाला 

🌸आगरी मसाला एकच मसाला वापरून veg Non veg दोन्ही पदार्थ अतिशय चवदार बनवा...





साहित्य : (10 किलो मिरच्यांच्या प्रमाणासह )

मिरच्या : 

1) संकेश्वरी मिरची : 2 kg

2) काश्मिरी मिरची : 3 kg 

3) ब्याडगी मिरची : 3 kg

4) लवंगी मिरची : 2 kg


इतर साहित्य : 

1) धणे (coriander seeds ) : 1 kg

2) मोहरी (mustard seeds) : अर्धा किलो (1/2 kg)

3) शहाजिरे (caraway seeds)seeds ): पाव किलो (1/4 kg)

4) मिरी ( black paper ) : पाव किलो 

5) हळद ( turmeric ) : अर्धा किलो 

6) दालचिनी ( cinnamon ) : अर्धा किलो 

7) लवंग ( cloves ) : 100 ग्रॅम 

8) मसाला वेलची (black cardamom ) : 100 ग्रॅम 

9) बडीशेप ( fennel seeds ) : 100 ग्रॅम 

10) जायफळ ( nutmeg) : 10 नग 

11) त्रिफळा (triphala) : 100 ग्रॅम 

12) नागकेशर (Ceylon ironwood ) : 100 ग्रॅम 

13) दगडफूल (black stone flower) : 50 ग्रॅम 

14) चक्रीफूल ( star anise ) : 50 ग्रॅम 

15) जावित्री (mace): 50 ग्रॅम 

16) हिंग ( asoefotid ) : 200 ग्रॅम 

17) तमालपत्र ( bay leafs ): 100 ग्रॅम 

18) गुलाबाच्या पाकळ्या(dry rose petals) : 100 ग्रॅम 


कृती :- 

1)सर्वप्रथम सर्व मिरच्या उन्हात वाळवून घेऊन त्यांची देठे तोडून घ्यावीत.

2) मसाल्याचे सर्व पदार्थ  हलकेच भाजून घ्यावेत, जास्त भाजू नयेत नाहीतर मसाल्याला काळपट रंग येतो .

3) जर मसाला दळायला मसाल्याच्या डंका वर देणार असाल तर मिरच्या भाजण्याची गरज पडत नाही, तिथे योग्य प्रमाणात मिरच्या भाजून च मसाला दळला जातो.. जर डंका वर देणार नसाल तर तुम्ही मिरच्या हलकेच भाजून घेऊ शकता .

4) मिरच्या व सर्व भाजलेले मसाले थंड झाल्यावर मसाल्याच्या डंका वरून दळून आणणे.

5) घरी आणल्या नंतर मसाला थंड करून च प्लास्टिक च्या हवाबंद पिशव्यांमध्ये घालून त्यामध्ये हिंगाचे 2 खडे घालून pack करून ठेवावेत.. हिंगामुळे मसाला खराब होत नाही...

6) हा मसाला अगदी 2 वर्षे ही टिकतो..

7) अतिशय colorful व tasty असा हा मसाला veg - Non veg दोन्ही साठी वापरला जातो..व हा मसाला वापरल्यास पदार्थांत वरून दुसरा कोणताही मसाला टाकण्याची आवश्यकता भासत नाही...




आणि मसाले अगदी हलकेच भाजायचे फक्त त्यातील moisture निघेल एवढेच नाहीतर taste ला थोडा कडवट होतो मसाला

गाजर - बीटाचे गुलाबजामून

 

❤️गाजर बीटाचे गुलाबजामून healthy आणि tasty मिठाई ❤️Carrot - beetroot delight 

साहित्य : 

1) गाजर 

२) बीट 

३) रवा 

४) दूध 

५) वेलची पावडर 


पाकासाठी 

साखर, वेलचीपूड, पाणी 

तळण्यासाठी तूप / तेल


१1


घरगुती मसाल्यातली मटर पनीर


मटर पनीर मसाला न वापरता घरगुती मसाल्यातली रेस्टॉरंट स्टाईल मटर पनीर भाजी #matarpaneer

🌸साहित्य : 🌸
1) मटर / mutter 
2) पनीर / paneer 

🌸ग्रेव्ही साठी 
कांदा : 4 मोठे 
टोमॅटो : 2 मोठे 
आलं लसूण पेस्ट : 1 चमचा 
🌸मसाले :
मिरची पावडर : 1 चमचा 
मसाला :  1 चमचा 
गरम मसाला : अर्धा चमचा 
हळद : पाव चमचा 
🌸Additional ingredients :
टोमॅटो ketchup : 1 ते 2 चमचे 
कसुरी मेथी : पाव चमचा 
गूळ :  1चमचा 
🌸कृती :
कांदा , टोमॅटो थोड्या तेलावर परतून थोडं थंड करून मिक्सर मधून पेस्ट बनवून घ्यावी 
मटर शिजवून घ्यावे.. पनीर चे चौकोनी तुकडे करून तेलामध्ये fry करून घ्यावेत..
कढईत थोडं तेल व थोडं बटर घेऊन त्यात कांद्याची पेस्ट परतून घ्यावी,.. आलं लसूण पेस्ट घालून ती ही परतावी... नंतर मसाले घालावेत व टोमॅटोची पेस्ट घालून mix करून थोडं पाणी घालून सगळे मसाले एकजीव करावेत 
आता त्यात मटर घालून mix करून एक वाफ काढावी व नंतर पनीर चे तुकडे घालून अलगद mix करावी.. व नंतर एखाद वाटी गरम पाणी घालून एक उकळी काढावी.व चवीपुरतं मीठ घालावे 
आता ह्या मध्ये 3 खास पदार्थ घालावेत जेणेकरून भाजी ची taste रेस्टॉरंट सारखी लागेल तर हे तीन पदार्थ आहेत, टोमॅटो ketchup, कसुरी मेथी आणि गूळ.. हे तिन्ही पदार्थ mix करून झाकण ठेऊन 2 मिनिट वाफ काढावी 
आणि अगदी रेस्टॉरंट स्टाईल मटर पनीर ची भाजी तयार...




सातपदरी / साट्याची / पुडाची रंगीत करंजी


 https://youtu.be/orcmCYEN3-8?si=5nXRTLBMqHdrEBcU

💐सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा 💐

❤️3 रंगांची सातपदरी करंजी /साट्याची / पुडाची / खाज्याची करंजी 


🌸*पारी(कव्हर )

मैदा :- 2 वाट्या

मीठ :- चवीनुसार

तेल :- पाव वाटी(मोहना साठी)

फूड कलर आवडीप्रमाणे (इथे मी Orange आणि हिरवा रंग घेतलाय )


1)मैद्यामध्ये मीठ व मोहन घालून मैद्याचे  4 भाग करावे व एकामध्ये चिमूटभर orange व एकामध्ये हिरवा कलर घालावा व दोन भाग प्लेन ठेवावे . तीनही पीठे मळून घ्यावीत 

 

3) हे तिन्ही गोळे  10 mins rest, ला ठेवावे.



🌸* सारण (फिलिंग) :-- 

रवा :- 1 वाटी

खसखस :- 2 चमचे

खोबरं :- अर्धी वाटी 

पीठी साखर :- पाऊण वाटी ( गोडाच्या आवडीनुसार कमी जास्त करावी )

डॉयफ्रूट्स :- पाव वाटी (क्रश करून घ्यावे)

वेलची पूड :- पाव चमचा


रवा, खसखस व खोबरं चांगलं भाजून घ्यावं. ड्रायफ्रूट्स तुपात तळून घ्यावे.

थंड झाल्यावर त्यात साखर व वेलची पूड मिक्स करून  सर्व जिन्नस एकजीव करून घ्यावे.



🌸* साठा  :-

अर्धी वाटी तूप 

1 वाटी आरारूट किंवा कॉर्नफ्लोअर


तूप फेटून घ्यावे व त्यात आरारूट/कॉर्नफ्लोअर घालून पुन्हा फेटावे व श्रीखंड च्या consistancy चं मिश्रण बनवावं.


🌸*कृती :--

1..प्रथम मैद्याच्या चार वेगवेगळ्या पोळ्या लाटून घ्याव्या म्हणजे 2 पांढऱ्या ( plain ), एक orange व एक हिरवी 


2..मग त्यातील एक पोळी घेऊन त्यावर साठा लावून घ्यावा-त्यावर दुसरी पोळी ठेवावी व थोडी हलकेच प्रेस करून परत त्यावर साठा लावून घ्यावा आणि तीसरी पोळी ठेवावी थोडी प्रेस  करून परत त्यावर साठा लावावा .व शेवटी चौथी पोळी ठेऊन त्यावरही साटा लावून घ्यावा (process same अळूवडी प्रमाणे )



3..नंतर अळूवडी चा जसा रोल करतो तसा रोल करून घ्यावा रोल दाबून दाबून घट्ट करावा नाहीतर करंजी तळताना पापुद्रे सुटून जातात .(हा रोल15 min rest साठी ठेवावा )

4..नंतर रोल cut करताना प्रथम मधून उभा व नंतर आडवा cut करावा (+ sign प्रमाणे ),परत त्याचे 2 ते 3 cm आकाराचे छोटे -छोटे तुकडे करून घ्यावे .

5. लाटताना पोळपाटावर प्लास्टिक चा पेपर घालावा म्हणजे चिकटत नाही.

6..पापुद्र्याची side खाली ठेवून प्लेन side वर ठेवून त्या कट केलेल्या तुकड्याला हाताने प्रेस करावे .

7..आणि मग नेहमी च्या करंजी प्रमाणे पारी लाटून त्यात सारण भरून दुधाने कडा घट्ट दाबून बंद कराव्यात.

8..तळताना करंजी तुपातच तळावी- तळताना करंजी तुपात सोडल्यानंतर त्यावर झारीने तूप सोडत राहावे म्हणजे पापुद्रे छान सुटून येतात.

9..करंजी जास्त डार्क न करता हलकेच गुलाबी रंगावर तळून घ्यावी.म्हणजे कलर कळवंडल्या सारखे न दिसता फ्रेश दिसतात...🌸


(2 वाट्या मैदयामध्ये साधारण 15-20 करंज्या बनतात (लहान-मोठ्या आकाराप्रमाणे ) आणि रेसिपी बनवण्यासाठी साधारण 2 तास लागतात..)





👍

ओल्या नारळाच्या खुसखुशीत करंज्या

 अगदी खुसखुशीत कव्हर व रसरशीत सारणाच्या ओल्या नारळाच्या करंज्या 🌸olya narlachya karanjya 


https://youtu.be/yeJatED4hzA?si=4Xn0bcI49v2CqnzA


साहित्य : 

🌹सारण 🌹

१) ओल्या नारळाचा चव : ३ वाट्या 

२) गूळ : दीड वाटी 

३) dryfruits आवडीप्रमाणे 

४) वेलची पावडर : पाव चमचा 

🌹पारी 🌹

१) मैदा / गव्हाचं पीठ : २ वाट्या 

२) रवा : २ मोठे चमचे 

३) आरारुट / कॉर्नफ्लोअर : २ चमचे 

४) तेल मोहनासाठी : पाव वाटी 

५) तेल करंज्या तळण्यासाठी 

६) मीठ :अर्धा चमचा 



 

Veg अंडा करी ( eggless egg curry )

 




Eggless Veg अंडा करी potato paneer अंडा curry बिना अंड्याची अंडा करी #vegandacurry
🌹  



साहित्य :-
1) उकडलेले बटाटे
2) पनीर
3) basic gravy
4) cornflour / आरारुट

1) उकडलेले बटाटे किसून घ्यावेत, त्यात चवीनुसार मीठ व थोडं कॉर्नफ्लोअर घालून मळून घ्यावे
2) पनीर मध्ये चवीप्रमाणे मीठ व रंगासाठी थोडी हळद घालून मळून घ्यावे
3) बटाट्याचे मोठे व पनीर चे छोटे गोळे बनवून घ्यावे
4) बटाट्याच्या गोळ्याची पारी बनवून त्यात पनीर चा गोळा stuff करून त्याला अंड्याचा आकार द्यावा
5) हे कोफ्ते तेलात तळताना फुटू नयेत म्हणून त्यांना कॉर्नफ्लोअर मध्ये घोळवावेत
6) नंतर कढईत तेल गरम करून घ्यावे व गॅस ची आंच low वर करून हे कोफ्ते अलगद तेलात सोडावेत
7) व सोनेरी रंगावर तळून घ्यावेत
8) आता basic gravy ची gravy बनवून घ्यावी व हे कोफ्ते gravy मध्ये serving च्या 5 mins अगोदर घालावेत ( कोफ्ते जास्त वेळ gravy मध्ये राहिले तर विरघळतात )
9) आणि अगदी अंड्या सारखी दिसणारी आणि अतिशय tasty veg अंडा करी तयार..


Ganpati decoration ideas

  कुंदन ची आकर्षक फुले बनवून गणपती decoration साठी वेगवेगळ्या गोष्टी बनवा  साहित्य :  कुंदन  Diamonds  Glue