❤️आगरी मसाला ❤️10 किलो,अतिशय चविष्ट,झणझणीत, लालभडक रंगाचा आगरी मसाला
🌸आगरी मसाला एकच मसाला वापरून veg Non veg दोन्ही पदार्थ अतिशय चवदार बनवा...
साहित्य : (10 किलो मिरच्यांच्या प्रमाणासह )
मिरच्या :
1) संकेश्वरी मिरची : 2 kg
2) काश्मिरी मिरची : 3 kg
3) ब्याडगी मिरची : 3 kg
4) लवंगी मिरची : 2 kg
इतर साहित्य :
1) धणे (coriander seeds ) : 1 kg
2) मोहरी (mustard seeds) : अर्धा किलो (1/2 kg)
3) शहाजिरे (caraway seeds)seeds ): पाव किलो (1/4 kg)
4) मिरी ( black paper ) : पाव किलो
5) हळद ( turmeric ) : अर्धा किलो
6) दालचिनी ( cinnamon ) : अर्धा किलो
7) लवंग ( cloves ) : 100 ग्रॅम
8) मसाला वेलची (black cardamom ) : 100 ग्रॅम
9) बडीशेप ( fennel seeds ) : 100 ग्रॅम
10) जायफळ ( nutmeg) : 10 नग
11) त्रिफळा (triphala) : 100 ग्रॅम
12) नागकेशर (Ceylon ironwood ) : 100 ग्रॅम
13) दगडफूल (black stone flower) : 50 ग्रॅम
14) चक्रीफूल ( star anise ) : 50 ग्रॅम
15) जावित्री (mace): 50 ग्रॅम
16) हिंग ( asoefotid ) : 200 ग्रॅम
17) तमालपत्र ( bay leafs ): 100 ग्रॅम
18) गुलाबाच्या पाकळ्या(dry rose petals) : 100 ग्रॅम
कृती :-
1)सर्वप्रथम सर्व मिरच्या उन्हात वाळवून घेऊन त्यांची देठे तोडून घ्यावीत.
2) मसाल्याचे सर्व पदार्थ हलकेच भाजून घ्यावेत, जास्त भाजू नयेत नाहीतर मसाल्याला काळपट रंग येतो .
3) जर मसाला दळायला मसाल्याच्या डंका वर देणार असाल तर मिरच्या भाजण्याची गरज पडत नाही, तिथे योग्य प्रमाणात मिरच्या भाजून च मसाला दळला जातो.. जर डंका वर देणार नसाल तर तुम्ही मिरच्या हलकेच भाजून घेऊ शकता .
4) मिरच्या व सर्व भाजलेले मसाले थंड झाल्यावर मसाल्याच्या डंका वरून दळून आणणे.
5) घरी आणल्या नंतर मसाला थंड करून च प्लास्टिक च्या हवाबंद पिशव्यांमध्ये घालून त्यामध्ये हिंगाचे 2 खडे घालून pack करून ठेवावेत.. हिंगामुळे मसाला खराब होत नाही...
6) हा मसाला अगदी 2 वर्षे ही टिकतो..
7) अतिशय colorful व tasty असा हा मसाला veg - Non veg दोन्ही साठी वापरला जातो..व हा मसाला वापरल्यास पदार्थांत वरून दुसरा कोणताही मसाला टाकण्याची आवश्यकता भासत नाही...
आणि मसाले अगदी हलकेच भाजायचे फक्त त्यातील moisture निघेल एवढेच नाहीतर taste ला थोडा कडवट होतो मसाला

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा