🌸साहित्य : 🌸
1) मटर / mutter
2) पनीर / paneer
🌸ग्रेव्ही साठी
कांदा : 4 मोठे
टोमॅटो : 2 मोठे
आलं लसूण पेस्ट : 1 चमचा
🌸मसाले :
मिरची पावडर : 1 चमचा
मसाला : 1 चमचा
गरम मसाला : अर्धा चमचा
हळद : पाव चमचा
🌸Additional ingredients :
टोमॅटो ketchup : 1 ते 2 चमचे
कसुरी मेथी : पाव चमचा
गूळ : 1चमचा
🌸कृती :
कांदा , टोमॅटो थोड्या तेलावर परतून थोडं थंड करून मिक्सर मधून पेस्ट बनवून घ्यावी
मटर शिजवून घ्यावे.. पनीर चे चौकोनी तुकडे करून तेलामध्ये fry करून घ्यावेत..
कढईत थोडं तेल व थोडं बटर घेऊन त्यात कांद्याची पेस्ट परतून घ्यावी,.. आलं लसूण पेस्ट घालून ती ही परतावी... नंतर मसाले घालावेत व टोमॅटोची पेस्ट घालून mix करून थोडं पाणी घालून सगळे मसाले एकजीव करावेत
आता त्यात मटर घालून mix करून एक वाफ काढावी व नंतर पनीर चे तुकडे घालून अलगद mix करावी.. व नंतर एखाद वाटी गरम पाणी घालून एक उकळी काढावी.व चवीपुरतं मीठ घालावे
आता ह्या मध्ये 3 खास पदार्थ घालावेत जेणेकरून भाजी ची taste रेस्टॉरंट सारखी लागेल तर हे तीन पदार्थ आहेत, टोमॅटो ketchup, कसुरी मेथी आणि गूळ.. हे तिन्ही पदार्थ mix करून झाकण ठेऊन 2 मिनिट वाफ काढावी
आणि अगदी रेस्टॉरंट स्टाईल मटर पनीर ची भाजी तयार...
