Ad

सातपदरी / साट्याची / पुडाची रंगीत करंजी


 https://youtu.be/orcmCYEN3-8?si=5nXRTLBMqHdrEBcU

💐सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा 💐

❤️3 रंगांची सातपदरी करंजी /साट्याची / पुडाची / खाज्याची करंजी 


🌸*पारी(कव्हर )

मैदा :- 2 वाट्या

मीठ :- चवीनुसार

तेल :- पाव वाटी(मोहना साठी)

फूड कलर आवडीप्रमाणे (इथे मी Orange आणि हिरवा रंग घेतलाय )


1)मैद्यामध्ये मीठ व मोहन घालून मैद्याचे  4 भाग करावे व एकामध्ये चिमूटभर orange व एकामध्ये हिरवा कलर घालावा व दोन भाग प्लेन ठेवावे . तीनही पीठे मळून घ्यावीत 

 

3) हे तिन्ही गोळे  10 mins rest, ला ठेवावे.



🌸* सारण (फिलिंग) :-- 

रवा :- 1 वाटी

खसखस :- 2 चमचे

खोबरं :- अर्धी वाटी 

पीठी साखर :- पाऊण वाटी ( गोडाच्या आवडीनुसार कमी जास्त करावी )

डॉयफ्रूट्स :- पाव वाटी (क्रश करून घ्यावे)

वेलची पूड :- पाव चमचा


रवा, खसखस व खोबरं चांगलं भाजून घ्यावं. ड्रायफ्रूट्स तुपात तळून घ्यावे.

थंड झाल्यावर त्यात साखर व वेलची पूड मिक्स करून  सर्व जिन्नस एकजीव करून घ्यावे.



🌸* साठा  :-

अर्धी वाटी तूप 

1 वाटी आरारूट किंवा कॉर्नफ्लोअर


तूप फेटून घ्यावे व त्यात आरारूट/कॉर्नफ्लोअर घालून पुन्हा फेटावे व श्रीखंड च्या consistancy चं मिश्रण बनवावं.


🌸*कृती :--

1..प्रथम मैद्याच्या चार वेगवेगळ्या पोळ्या लाटून घ्याव्या म्हणजे 2 पांढऱ्या ( plain ), एक orange व एक हिरवी 


2..मग त्यातील एक पोळी घेऊन त्यावर साठा लावून घ्यावा-त्यावर दुसरी पोळी ठेवावी व थोडी हलकेच प्रेस करून परत त्यावर साठा लावून घ्यावा आणि तीसरी पोळी ठेवावी थोडी प्रेस  करून परत त्यावर साठा लावावा .व शेवटी चौथी पोळी ठेऊन त्यावरही साटा लावून घ्यावा (process same अळूवडी प्रमाणे )



3..नंतर अळूवडी चा जसा रोल करतो तसा रोल करून घ्यावा रोल दाबून दाबून घट्ट करावा नाहीतर करंजी तळताना पापुद्रे सुटून जातात .(हा रोल15 min rest साठी ठेवावा )

4..नंतर रोल cut करताना प्रथम मधून उभा व नंतर आडवा cut करावा (+ sign प्रमाणे ),परत त्याचे 2 ते 3 cm आकाराचे छोटे -छोटे तुकडे करून घ्यावे .

5. लाटताना पोळपाटावर प्लास्टिक चा पेपर घालावा म्हणजे चिकटत नाही.

6..पापुद्र्याची side खाली ठेवून प्लेन side वर ठेवून त्या कट केलेल्या तुकड्याला हाताने प्रेस करावे .

7..आणि मग नेहमी च्या करंजी प्रमाणे पारी लाटून त्यात सारण भरून दुधाने कडा घट्ट दाबून बंद कराव्यात.

8..तळताना करंजी तुपातच तळावी- तळताना करंजी तुपात सोडल्यानंतर त्यावर झारीने तूप सोडत राहावे म्हणजे पापुद्रे छान सुटून येतात.

9..करंजी जास्त डार्क न करता हलकेच गुलाबी रंगावर तळून घ्यावी.म्हणजे कलर कळवंडल्या सारखे न दिसता फ्रेश दिसतात...🌸


(2 वाट्या मैदयामध्ये साधारण 15-20 करंज्या बनतात (लहान-मोठ्या आकाराप्रमाणे ) आणि रेसिपी बनवण्यासाठी साधारण 2 तास लागतात..)





👍

२ टिप्पण्या:

Ganpati decoration ideas

  कुंदन ची आकर्षक फुले बनवून गणपती decoration साठी वेगवेगळ्या गोष्टी बनवा  साहित्य :  कुंदन  Diamonds  Glue