Ad

घरगुती मसाल्यातली मटर पनीर


मटर पनीर मसाला न वापरता घरगुती मसाल्यातली रेस्टॉरंट स्टाईल मटर पनीर भाजी #matarpaneer

🌸साहित्य : 🌸
1) मटर / mutter 
2) पनीर / paneer 

🌸ग्रेव्ही साठी 
कांदा : 4 मोठे 
टोमॅटो : 2 मोठे 
आलं लसूण पेस्ट : 1 चमचा 
🌸मसाले :
मिरची पावडर : 1 चमचा 
मसाला :  1 चमचा 
गरम मसाला : अर्धा चमचा 
हळद : पाव चमचा 
🌸Additional ingredients :
टोमॅटो ketchup : 1 ते 2 चमचे 
कसुरी मेथी : पाव चमचा 
गूळ :  1चमचा 
🌸कृती :
कांदा , टोमॅटो थोड्या तेलावर परतून थोडं थंड करून मिक्सर मधून पेस्ट बनवून घ्यावी 
मटर शिजवून घ्यावे.. पनीर चे चौकोनी तुकडे करून तेलामध्ये fry करून घ्यावेत..
कढईत थोडं तेल व थोडं बटर घेऊन त्यात कांद्याची पेस्ट परतून घ्यावी,.. आलं लसूण पेस्ट घालून ती ही परतावी... नंतर मसाले घालावेत व टोमॅटोची पेस्ट घालून mix करून थोडं पाणी घालून सगळे मसाले एकजीव करावेत 
आता त्यात मटर घालून mix करून एक वाफ काढावी व नंतर पनीर चे तुकडे घालून अलगद mix करावी.. व नंतर एखाद वाटी गरम पाणी घालून एक उकळी काढावी.व चवीपुरतं मीठ घालावे 
आता ह्या मध्ये 3 खास पदार्थ घालावेत जेणेकरून भाजी ची taste रेस्टॉरंट सारखी लागेल तर हे तीन पदार्थ आहेत, टोमॅटो ketchup, कसुरी मेथी आणि गूळ.. हे तिन्ही पदार्थ mix करून झाकण ठेऊन 2 मिनिट वाफ काढावी 
आणि अगदी रेस्टॉरंट स्टाईल मटर पनीर ची भाजी तयार...




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Ganpati decoration ideas

  कुंदन ची आकर्षक फुले बनवून गणपती decoration साठी वेगवेगळ्या गोष्टी बनवा  साहित्य :  कुंदन  Diamonds  Glue