![]() |
https://youtu.be/qS7uuBjVxOg?si=zBxl7B7QIUoNwCQJ
🌹भाजणी ची चकली 🌹
भाजणी कोणतीही असू दे, पीठ व्यवस्थित मळलं तर चकली हमखास खुसखुशीत होतेच हा माझा अनुभव आहे.. त्यासाठी नेहमी पेक्षा थोड्या वेगळ्या पद्धतीने पीठ मळलं तर तळताना ही जास्त तेल लागत नाही, आणि चकल्या तेल ही पीत नाहीत व अगदी खुसखुशीत, काटेरी खमंग चकली बनते.. तर नक्की try करा, ही पद्धत 👍
कृती :-
1) भाजणी :- ४ कप
2) पाणी :-3 कप
3) तेल :- अर्धी वाटी
4)हळद :- पाव चमचा
5)मिरची पावडर :- एक चमचा
6) हिंग :- पाव चमचा
7) तीळ :- २ चमचे
8)ओवा :- चमचे
9) मीठ चवीनुसार
चकलीची कृती
1)एका भांड्यात अर्धी वाटी तेल तापत ठेवावे.व दुसऱ्या भांड्यात 3 वाट्या पाणी गरम करावे..
1) एका परातीमधे 4 कप भाजणी घ्यावी. त्यामध्ये 1चमचा मिरचीपूड, पाव चमचा हळद,2 चमचे तीळ,2चमचे ओवा, पाव चमचा हिंग व चवीप्रमाणे मीठ घालून सर्व जिन्नस mix करून घ्यावे
2) तेल तापल्यावर ( थोडासा धूर येऊ लागल्यावर ) लगेच ते तेल भाजणीवर घालावे व चमच्याने mix करावे, व थोडे थंड झाल्यावर हाताने ते तेल भाजणीमध्ये पूर्णपणे चोळून चोळून एकजीव करावे.
3) व गरम केलेलं पीठावर घालून पीठ मळून घ्यावे व त्यावर झाकण ठेवून 1 तास rest ला ठेवावे.
4) साधारण 1 तासाने हे पीठ पाण्याचा हात हात लावून लावून पुन्हा चांगलं मळून घ्यावं..
5) एका pan मध्ये तेल तापत ठेवावे.
6) व चकली च्या साच्याला आतून थोडं तेल लावून त्यात बसेल एवढा मळलेल्या पिठाचा गोळा भरावा व झाकण बंद करून हव्या तश्या (छोट्या - मोठ्या ) चकल्या बनवून घ्याव्या.(कागदाचे वेगवेगळे छोटे छोटे तुकडे करून एका तुकड्या वर एक चकली बनवावी म्हणजे एक एक चकली तेलात सहज सोडता येते )
7) चकल्या तेलात सोडताना गॅस high -flame वर ठेवावा व चकल्या तेलात सोडल्या नंतर flame मध्यम ठेवावी.1 मिनिटांनंतर चकल्या पलटून घ्याव्या व चकल्यांमधून बुडबुडे येणे कमी झाले की चकल्या तेलातून काढून घ्याव्या.
8) थंड झाल्यानंतर हवाबंद डब्यात भरून ठेवाव्यात.
9) ह्या चकल्या हमखास खुसखुशीत होतात.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा